आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे दाखल:निमगाव प्रकरणात अखेर भोंदूबाबासह इतरांवर गुन्हा

शिरुर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निमगाव मायंबा येथील एका महिलेच्या अंगातील भूत काढण्यासाठी राक्षसभवन शनी येथून एका भोंदू बाबाला बोलवून अघोरी कृत्य करणारे सासू व पती यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिरूर न्यायालयाकडून देण्यात आले होते या अनुषंगाने चकलांबा पोलिससांनी संबंधित मांत्रिक, पती व सासूवर रीतसर गुन्हे दाखल केले आहेत.

निमगाव मायंबा येथील दीक्षा कल्याण कातखडे हिला भूतबाधा झाली असून तिच्या अंगातील भूत काढण्यासाठी पती कल्याण माणिक कातकडे सासू लक्ष्मी माणिक कातकडे यांनी राक्षसभवन येथून भोंदू बाबा मारुती जनार्धन वावरे यांना बोलावून घेतले तंत्र, मंत्र व अघोरी करत भोंदू बाबाने दीक्षा हिला गुंगीचे औषध व लिंबू पाणी देऊन बेशुद्ध केले व तिच्या अंगातील भूत काढण्यासाठी कवड्याच्या माळीने तिच्या डोक्यावर प्रहार केला. भूत काढण्याच्या नावाखाली तिला मारहाण करण्यात आली यामुळे दीक्षा काही काळ बेशुद्ध पडून राहिली हा प्रकारे तिच्या राहत्या घरी १६ फेब्रुवारी मध्ये दुपारी घडला होता.

बातम्या आणखी आहेत...