आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:जिल्हा परिषद गटात; खोकरमोहा येथील अशोक केकाण यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

बीड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरूर तालुक्यातील खोकरमोह, रायमोहा जिल्हा परिषद गटातील युवा नेते अशोक केकाण यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई येथील ओबीसी विभागाच्या मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार रजनी अशोकराव पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, बीड काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपध्यक्ष राहूल सोनवणे, शिरूर तालुकाध्यक्ष रमेश सानप, युवा नेते संभाजी जाधव यांच्या नेतृत्वावाखाली अशोक केकाण यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

काँग्रेसचे ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही केकाण यांनी याप्रसंगी दिली. तसेच आगामी काळात पक्षसंघटन बळकट करण्यासाठी विशेष मोहिम राबवणार असल्याची माहितीही केकाण यांनी याप्रसंगी दिली.

बातम्या आणखी आहेत...