आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:श्री समर्थ पार्कमध्ये वृक्षारोपणासह कमानीचे लोकार्पण, लोकसहभागातून कामे

गेवराईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ताकडगाव रोडवर असलेल्या श्री समर्थ पार्कमध्ये गणेशोत्सव व गौराई पूजनाच्या मुहूर्तावर रविवारी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच श्री समर्थ पार्क कमानीचेदेखील या वेळी लोकार्पण करण्यात आले. नागरिकांनी लोकसहभागातून रस्ता, सिमेंट बाकडे यासह लोखंडी कमान, पथदिवे आदी कामे केली.

यासह करंजी, बदाम, फणस, जांभळ आदी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. या वेळी गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे, विवेक माने, मच्छिंद्र गाडे, अशोकराव गोंडे, मोहिते, माउली ठोसर, सौरभ पाखरे, रवींद्र ओव्हळ, हरिभाऊ घोडके, अजिनाथ वाडेकर, प्रवीण घोडके, श्याम गाडे, बंटी माने आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...