आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजलगाव तालुक्यातील टाकरवण ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी बळीराजा भवनाचे उद्घाटन करण्यात आले. कारखान्याला ऊस देण्यासाठी तसेच शासनाच्या नवीन योजनांसाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागते. शेतकऱ्यांची ही समस्या दूर व्हावी, यासाठी टाकरवण ग्रामपंचायतीने बळीराजा भवन सुरु केले. माजलगाव तालुक्यातील प्रत्येक साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांनी या बळीराजा भवनात येऊन भेट द्यावी, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सोय होणार आहे.
तसेच शासनाच्या योजनांची माहिती इथे मिळणार आहे. तसेच नवी योजना असल्यास शासनाचे कर्मचारी येथे भेट देणार आहेत. त्यामुळे बळीराजा भवनाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. टाकरवण ग्रामपंचायतीने राबलेल्या या उपक्रमाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच सुनिल तौर, संचालक गणपतराव आरबे, संचालक रावसाहेब गायकवाड, वसिम पटेल, महादेव कदम, संतोष खोमाड, सलीम शेख, दत्ता बनगर, विलास लव्हाळे, प्रभु गरड, दत्ता धायरे, राहुल ढाळे, ढगे, वसंत पुंगळे आदी हजर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.