आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद‌्घाटन:जिल्हाधिकारी शर्मा यांच्या देखाव्याचे आज हस्ते उद‌्घाटन

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरामध्ये मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहुुन बीडचा राजा न्यु गणेश मित्र मंडळाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाच्या गणेश उत्सवामध्ये सिंहाचे प्रवेशद्वारे असणाऱ्या शंभर फुट लांब गुफेतून वैष्णाे देवी प्रतीकृती दर्शनाचा देखावा साकारला आहे. या देखाव्याचे उद‌्घाटन साेमवारी (दि. ५) रात्री आठ वाजता जिल्हाधिकारी राधाबिनाेद शर्मा यांच्या हस्ते हाेणार आहे.

मंडळाचे मार्गदर्शक गिरीष गिलडा यांनी सांगितले की, सोमवारी ( दि.५ ) रात्री आठ वाजता शनी मंदिर गल्ली, विठ्ठल मंदिर चौक पेठ बीड येथे देखाव्याचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमृत काका सारडा, राजयोग फाउंडेशन चे अध्यक्ष शुभम धुत यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत. बीडकरांनी देखाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बीड चा राजा न्यु गणेश मित्र मंडळ अध्यक्ष बबलू गिलडा, कार्याध्यक्ष विशाल शर्मा, उपाध्यक्ष व्यंकटेश दोडे, सचिव सतीश पगारिया, कोषाध्यक्ष कृष्णा मुंदडा, सह नरेश मुंदडा, प्रगेश‌ कुलकर्णी, अभिजीत दोडे, फामजी पारिख, पुष्कर मुंदडा, गोविंद शर्मा, ऋषिकेश मुंदडा, श्रेयस गिलडा, राम पारिख, शाम पारिख, गोविंद शर्मा, गणेश लोंढे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...