आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:खोलेश्वर मध्ये सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन

अंबाजोगाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई येथील सांस्कृतिक मंडळ व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता.१७ ऑगस्ट) महाविद्यालयात सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन व देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी बहारदार देशभक्तीपर गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमासाठी मंचावर अध्यक्ष म्हणून वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.बिभिषन फड हजर होते तसेच उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या लता पत्की-निळकरी या उपस्थित होत्या तर स्वरांजली संगीत विद्यालय अंबाजोगाईच्या संचालिका श्रीदेवी पवार, उपप्राचार्य प्रा.डॉ. दिगंबर मुडेगावकर व सांस्कृतिक मंडळ प्रमुख प्रा.डॉ.तात्या पुरी यांचीही याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांच्या हस्ते सांस्कृतिक मंडळाचे उद्घाटन झाले. तसेच याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रा.डॉ.फड म्हणाले, अंबाजोगाई ही कला व संस्कृती जतन करणारी, संवर्धन करणारी भूमी आहे. त्यामुळे नव्या पिढीतील कलावंतांनी आपल्यातील कला अधिकाधिक विकसित व्हावी, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. खाेलेश्वर महाविद्यालयाचे सांस्कृतिक मंडळ हे विद्यार्थी घडवणारे केंद्र असल्याचे मतही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक उपक्रमांतील सहभाग वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गौतम गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. गंगा शेळके यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा.राजेंद्र बनसोडे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...