आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिरुर तालुक्यातील आर्वी येथील शांतीवन सामाजिक प्रकल्पामध्ये २६ व २७ डिसेंबर रोजी एकता फाउंडेशन आणि शांतीवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५वे एकता मराठी साहित्य संमेलन होत असून या संमेलनाचे उद्घाटन औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे आमदारविक्रम काळे यांच्या हस्ते होणार आहे.
५ वर्षांपासून एकता फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह युवक व साहित्यप्रेमी जनतेपर्यंत साहित्यांची गंगा पोहचविण्याचे कार्य एकता मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सुरू आहे. आजपर्यंत एकूण चार मराठी साहित्य संमेलनांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलेले असून यंदाचे ५ वे एकता मराठी साहित्य संमेलन शांतीवन येथे होत आहे.
२६ डिसेंबर रोजी संमेलनाध्यक्ष साहित्यिक दिनकर जोशी यांच्या उपस्थितीतील ग्रंथदिंडी श्रद्धेय बाबा आमटे साहित्य नगरीत पोहोचल्यानंतर स्वागताध्यक्ष दिपक नागरगोजे, रा.यु.काँ.चे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, शिवाजी पवार, चंपावती पानसंबळ, उषा सरवदे, सेवाश्रमचे संचालक सुरेश राजहंस आणि सरपंच भारती शहाजी भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाची सुरवात होईल. याच दिवशी विशेष सन्मान, राज्यस्तरीय पुरस्कार वितरण, साहित्य पुरस्कार, सोहळा होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.