आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवारी माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील जिल्हा परिषद शाळेजवळील मैदानात टीपीएल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे कार्यकर्ते लक्ष्मण लव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले. मैदानी खेळ खेळल्याने शारीरीक विकास होतो, त्याचबरोबर या क्षेत्रात उत्तम करियर देखील घडवता येते. तरुणांनी टाईमपास म्हणून खेळ न खेळता मैदानी खेळात करियर घडवावे असे प्रतिपादन यावेळी लक्ष्मण लव्हाळे यांनी केले. या क्रिकेट स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास ८००१ रुपयांचे बक्षीस लक्ष्मण लव्हाळे यांच्या वतीने दिले जाणार आहे.
द्वितीय येणाऱ्या संघास ५००१ रुपयाचे बक्षीस गणेश सातपुते यांच्या वतीने देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील संघांनी या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने चं द्रहास गोबरे, गणेश सातपुते, अशोकराव गायकवाड, योगेश कानडे, अप्पा तौर, विष्णू डोके, दयानंद गोबरे, अशोक भीसे, परमेश्वर सुरवसे,नवनाथ गरड,गणेश वराट, इरफान इनामदार, बाळु गोबरे यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.