आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात वाढ:टाकरवण फाटा रस्त्यावरील साइड पंखे भरले नसल्याने अपघातात वाढ; दुचाकी होतात स्लीप

टाकरवण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाकरवण ते टाकरवण फाटा या पाच किमी अंतराच्या रस्त्याच्या डांबरीकरण व दुरुस्तीचे काम नुकतेच झाले आहे. मात्र, दोन्ही बाजूंचे साइड पंखे मुरूम टाकून भरले नसल्याने व आधीच रस्ता अरुंद रस्ता असल्याने वाहन स्लीप होऊन अपघातांच्या घटनांत वाढ होत आहे. गुत्तेदार व संबंधित यंत्रणेचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

टाकरवणसह २० खेड्यांना महामार्गाशी जोडणारा टाकरवण ते टाकरवण फाटा रस्ता नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहतो. २० वर्षे आंदोलने केल्यानंतर ग्रामस्थांच्या संघर्षाला यश आले आहे व या रस्त्याच्या कामासाठी निधी मिळाला. तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून या रस्त्याचे दुरुस्तीचे काम करण्यात आले. आता तरी खड्ड्यांच्या प्रवासातून आपली सुटका होईल अशी अपेक्षा प्रवाशांना होती. परंतु, बोगस कामामुळे एका महिन्यातच या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. पुन्हा दुरुस्तीसाठी गावकऱ्यांनी तीन वर्षांपासून आंदोलने सुरू केली. अखेर मागील आठवड्यात या रस्त्याची पुन्हा एकदा दुरुस्ती करण्यात आली.

मात्र, आता साइड पंख्यांचे काम अर्धवट असे ठेवण्यात आले. आधीच रस्ता अरुंद आहे, त्यात साइड पंखे भरलेले नसल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते आहे. त्यातच गुत्तेदाराने व यंत्रणेने खर्च वाचवण्यासाठी साइड पंखे भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे लक्ष देत साइड पंखे उभारण्याबाबत संबंधित गुत्तेदाराला सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...