आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत असलेल्या शासकिय परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी क्षमतेत यंदापासून ३५ ने वाढ झाली आहे. आता एएनएम या परिचर्या सर्टिफिकेट पदवीची विद्यार्थी प्रवेश क्षमता २० वरुन ४० आणि जीएनएम या परिचर्या पदविकेची प्रवेश क्षमता २० वरुन ३५ झाली असल्याची माहिती, जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत असलेल्या या परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी संख्या वाढविण्याच्या मागणीच्या प्रस्तावाला सोमवारी (दि.१९) महाराष्ट्र परिचर्या परिषदेने मान्यता दिल्याचेही डॉ. सुरेश साबळे म्हणाले.जिल्हा रुग्णालयात मागच्या बाजूला स्वतंत्र इमारतीमध्ये शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्र चालविले जाते. या ठिकाणी पुर्वी एएनएम (ऑक्सीलियरी नर्स मिडवायफरी) या सर्टीफिकेट कोर्सच्या प्रशिणासाठी २० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता होती. तसेच जीएनएम (जनरल नर्सींग अँड मिडवायफरी) या परिचर्या पदविकेसाठी देखील विद्यार्थी प्रवेश क्षमता २० होती.
या ठिकाणचे प्रवेश महाराष्ट्र परिचर्या परिषदेच्या नियमानुसार प्रवर्गनिहाय दहावी व १२ वीतील गुणांच्या मेरीटने होतात, असेही डॉ. सुरेश साबळे यांनी सांगीतले. दरम्यान, येथील डाॅ.संतोष शहाणे, प्राचार्य डॉ. सुवर्णा बेदरे, मुख्य अधिसेविका रमा गिरी, सोनाली देशमुखआदींच्या माध्यमातून प्रशिक्षण केंद्राची विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढविण्याबाबत महाराष्ट्र परिषदेला प्रस्ताव सादर केला होता. प्रवेश क्षमता वाढविण्यासाठीच्या संपूर्ण अटींची पुर्तता करुन सर्व कागदपत्रे सादर केली होती. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सुविधा, स्टाफ याबद्दल माहिती दिली होती. त्यामुळे आता आता एएनएम या परिचर्या सर्टिफिकेट पदवीची विद्यार्थी प्रवेश क्षमता २० वरुन ४० आणि जीएनएम या परिचर्या पदविकेची प्रवेश क्षमता २० वरुन ३५ झाली आहे. त्यामुळे आता दरवर्षी दोन्ही सर्टीफिकेट व पदविकेच्या विद्यार्थ्यांची एकूण क्षमता ७५ असेल.
८० खोल्यांचे वसतिगृह
या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेमुळे परिचर्येचे विविध प्रशिक्षण शिक्षण काळातच अगदी उत्तम पद्धतीने शिकता येतात. त्यामुळे या ठिकाणचा निकाल देखील नेहमी चांगला लागत असते. अद्यायवत प्रशिक्षण केंद्रासह या ठिकाणी ८० खोल्यांचे उत्तम वसतीगृह देखील आहे.
शासकीयसह खासगी नोकऱ्यांची मोठी संधी
जिल्ह्याला होईल फायदा विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढीचा फायदा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे. शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्यांना शासकीय आरोग्य विभागात आणि खासगी दवाखान्यांमध्ये नोकऱ्यांमध्ये अधिक संधी अाहे. - डॉ. सुरेश साबळ, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.