आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:रेल्वे भूसंपादन मावेजासाठी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा तालुक्यातील कोतन, कारेगाव या गावातील शेतकऱ्यांची जमीन रेल्वेसाठी संपादित करण्यात आली. या जमिनीत बहुतांश शेतकऱ्यांचे झाडे, बोअर, पवळ होती. याचा मावेजा भूसंपादन कार्यालयाने दिला नसून तो तत्काळ देण्यात यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.

गेल्या काही वर्षापूर्वी मावेजा भूसंपादन विभागाने दिलेला नाही. या मावेजासाठी शेतकऱ्यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला. मात्र, याची दखल संबंधित विभाग घेत नसल्याने बुधवारी अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. या वेळी सय्यद रौफ, सय्यद सादीक, सय्यद शाहीद, सय्यद इस्माईल, सय्यद जुबेर, भगवान मिसाळ, भागवत जेधे, विठ्ठल भगत, अभिमान नीळकंठ, रावसाहेब निंबाळकर, प्रभू निंबाळकर आदी सहभाग आहेत.

बातम्या आणखी आहेत...