आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ॲट्रॉसिटीच्या गुन्हा:अत्याचार पीडितेचे बेमुदत उपोषण सुरूच

केज25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अत्याचार व ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात यावी या मागणीसाठी केज येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या पीडितेसह तिच्या तिच्या कुटुंबीयांचे तिसऱ्या दिवशी उपोषण सुरू होते. माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी भेट घेऊन त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन दिले.

केज तालुक्यातील एका परित्यक्ता महीलेवर नगरसेविकेचा पती सुग्रीव कराड याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. त्यातून दोन वेळा गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केल्याच्या पीडित महिलेच्या तक्रारीवरून केज पोलिसात बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला. मात्र आरोपीला अटक केली जात नसल्यावरून पीडित महिलेसह तिच्या वृद्ध आई - वडिलांनी ३० ऑगस्टपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी केज विधानसभेचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी उपोषणस्थळी भेट देत या प्रकरणी पोलीस अधीक्षक व सहाय्यक पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन आरोपीला अटक करण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन उपोषणकर्त्या कुटुंबास दिले. तर उपोषणकर्त्या वृद्ध आई - वडीलांची प्रकृती ढासळली असून त्यांनी औषधोपचारास नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...