आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:भारतीय संग्राम परिषद आयोजित; होळकर यांच्या जयंतीनिमित्त समाजभूषण पुरस्कार

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आ.विनायक मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राम व भारतीय संग्राम परिषद आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त धनगर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना अहिल्यादेवी होळकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.पुरस्काराचे वितरण प्रवीण दरेकर याच्या शुभहस्ते होणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक मेटे असणार आहेत तर, कार्यक्रमास अभिनेत्री ईषा केसकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. १२ जून रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सकाळी ११ वाजता वितरण होणार आहे. कार्यक्रमास भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे,शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद,शिवसंग्रामचे बीड शहराध्यक्ष अँड. राहुल मस्के,शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मनीषा कुपकर, माजी पं स.सभापती मनीषा कोकाटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा समाज भूषण पुरस्कार वितरित केला जाणार आहे.या पुरस्कारांमध्ये सन्मानचिन्ह व यथोचित सत्कार केला जाणार आहे.

पुरस्कार विजेत्यांमध्ये, अध्यात्मिक क्षेत्रात गोपाळ महाराज, सामाजिक क्षे­त्रातून अशोक चोरमले, प्रशासकीय विभागातून बालविकास अधिकारी सुदाम निर्मळ, सामाजिक क्षेत्रातून गणपत काकडे उद्योग क्षेत्रातून सुरेश कांबळे, सहकारी क्षेत्रातून डीडीआर सतीश देवकते, राजकीय क्षेत्रातून कल्याण आबुज, वैद्यकीय क्षेत्रातून अश्विनी गलांडे, वैद्यकीय क्षेत्रातून कोरोना लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे रोहन माने सिरम पुणे, व्यावसायिक क्षेत्राून महादेव सातपुते, कृषी क्षेत्रातून विक्रम सोनवणे, वैद्यकीय क्षेत्रातून डॉ.संतोषजी मारकड आदी मान्यवरांचा गुणगौरव करून समाजभूषण पुरस्कार प्रदान केला जाणार आहे

या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानेश्वर कोकाटे, शिवराम शिरगिरे , राहुल बनगर, नितीन बुधनर , भिमराव बेलदार, उमेश कोकाटे, रमेश कोकाटे, अविनाश राहिंज, सुनील खरात तथा बीड जिल्हा शिवसंग्राम परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे. धनगर समाजातील सामाजिक,अध्यात्मिक व राजकिय क्षेत्रातील प्रतिष्ठित महिला, पुरुष व तरुण वर्गानी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसंग्राम संघटना व भारतिय संग्राम परिषदेच्या वतीने केले गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...