आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाजोगाई:शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्ष संगोपन व संवर्धनासाठी छात्र सेनेचा पुढाकार

पुढाकार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. परंतु, यावर्षी तापमानात प्रचंड वाढ व त्यामुळे लावलेली वृक्ष जगवणे हे अवघड होत असतानाही छात्रसेनेचे विद्यार्थी स्वाराती महाविद्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेल्या वृक्षांच्या संगोपनासाठी प्रयत्न करत आहेत. कारण एनसीसी च्या माध्यमातून महाविद्यालयाचा परिसर हिरवागार करण्याचा प्रयत्न संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश खुरसाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

या परिसरात निसर्गरम्य ठिकाण करण्यासाठी माझाही हात लागावा यासाठी छात्रसेने चे विद्यार्थी त्या वृक्षांना आळे करणे, त्या वृक्षांच्या बुंध्याला खत टाकणे, त्यावर उन्हाचा परिणाम होऊ नये म्हणून ट्री गार्ड लावणे व त्याला कपडा झाकणे, वृक्षांना पाणी देणे, ठिबक सिंचन करणे, कोणत्याही परिस्थितीत हे वृक्ष वाळू नयेत हा निर्धार प्राचार्य पंजाबराव थारकर ,मेजर एस.पी. कुलकर्णी, प्राध्यापक राम बर्डे ,राहुल घाडगे, बाजीराव गायकवाड ,पवन कुलकर्णी, रोहन कुलकर्णी ,शुभम कातकडे, सुप्रिया साखरे भाग्यश्री आखाडे ,सोनाली यादव ,चौरे इत्यादी छात्र प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...