आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्याय:विधान परिषदेवर डावलण्यात ; पक्षातून गटबाजी करत पंकजांवर अन्याय

केज21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर डावलण्यात आल्याने भाजपच्या केज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. पक्षातूनच गटबाजी करून त्यांच्यावर अन्याय केला जात असल्याने येणाऱ्या काळात भाजपला ४८ विधानसभा मतदारसंघांत फटका बसल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त करत चिंचपूर येथील मारुती मंदिरात शनिवारी हनुमान चालिसा पठण करत भाजपला सुबुद्धी देवो, अशी प्रार्थना केली.

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांना डावलून पक्षातून मराठवाड्यातील इतर नेत्यांची नावे पुढे करत गटबाजी केली जात आहे. पक्षातूनच गटबाजी करून त्यांच्यावर अन्याय केला जात असल्याने येणाऱ्या काळात त्याचा फटका ४८ विधानसभा मतदारसंघांत बसल्याशिवाय राहणार नाही. बीड जिल्ह्यात पक्षाचा पंचायत समिती सदस्यसुद्धा निवडून येणार नाही.

याचा भाजपने विचार करावा, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत भाजप पदाधिकाऱ्यांनी केज तालुक्यातील चिंचपूर येथील मारुती मंदिरात हनुमान चालिसा पठण करत भाजपला सुबुद्धी देवो, अशी प्रार्थना केली. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार, जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे, युवा नेते विष्णू घुले, दत्ता धस, डॉ. वासुदेव नेहरकर, संभाजी गायकवाड, बालासाहेब राऊत, प्रकाश मुंडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...