आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीड जिल्ह्यातील आष्टीचे दीपक दोंदे पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत आठ वर्षे इंजिनिअर होते. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने त्यांना गावाकडे परतावे लागले. या संकटाला संधीत बदलण्याचा निर्धार त्यांनी केला. शेतकरी, कृषी अधिकाऱ्यांशी होणाऱ्या चर्चेतून त्यांना व्यवसायाचे अनोखे मॉडेल गवसले आणि ‘डीएनडी’ अर्थात ‘डिझाइन अँड डेव्हलपमेंट फार्मर प्रोड्युसर कंपनी’चा जन्म झाला. गावातील दहा शेतकऱ्यांच्या सहभागातून सुरू झालेल्या या कंपनीचे आता दोनशे सभासद आहेत.
सरत्या वर्षातील लॉकडाऊनचा काळ अन्य व्यवसायांसाठी आव्हानात्मक होता. लोकांकडून पोषक आहाराची मागणी वाढली असताना सकस भाजीपाला पिकवूनही तो ग्राहकांपर्यंत पोहोचता येत नसल्याने शेतकरी त्रस्त होते. त्यातच कोरोनाच्या भीतीपोटी अनेकांची वृत्तपत्रांची वितरण साखळीही काहीशी विस्कळीत झाली होती. या तिन्ही घटकांना एकत्र आणणारी संकल्पना नाशिकच्या अमोल गोऱ्हे यांच्या ग्रीनफिल्ड अॅग्रो सर्व्हिसेसने साकारली. लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना ताजा व पोषक भाजीपाला, फळे हवी होती, पण वितरण साखळी विस्कळीत झाली होती. दुसरीकडे, वृत्तपत्र विक्रेत्यांचे काम थांबल्याने त्यांनाही रोजगाराची गरज होती. गोऱ्हे यांनी ठाणे येथील वृत्तपत्र विक्रेत्यांना प्रशिक्षण देऊन लॉजिस्टिक पार्टनर केले आणि त्यांच्या माध्यमातून नाशिकमधील शेतकऱ्यांचा भाजीपाला मुंबईतील दोन हजार ग्राहकांपर्यंत घरपोच पोहोचवण्याची यंत्रणा विकसित केली. आता हा विधायक पुढाकार नाविन्यपूर्ण व्यवसायाचे यशस्वी मॉडेल म्हणून पुढे आला आहे. नव्या वर्षात जाताना अशा कहाण्या उज्ज्वल भविष्याविषयी उमेद वाढवणाऱ्या आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.