आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी पाठपुरावा:धारूर किल्ला तटबंदी ढासळल्याप्रकरणी ‘पुरातत्त्व’च्या जतन शाखेकडून चौकशी; समितीत पाच जणांचा समावेश

संदिपान तोंडे | धारूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुरातत्त्व विभागाच्या मुंबई येथील जतन शाखेकडून किल्ल्याच्या कामाची चौकशी करण्यात येत आहे

धारूर येथील ऐतिहासिक किल्ल्यातील डागडुजी केलेल्या तीन भिंतीत काळ्या मातीचा वापर केल्याने पावसाचे पाणी जाऊन तीन महिन्यांत कोसळल्या असून चौथी भिंतदेखील फुगली. ‘दिव्य मराठी’च्या वृत्ताने राज्य पुरातत्त्व विभागाने त्रयस्थ समितीकडून लेखा परीक्षणाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पुरातत्त्व विभागाच्या मुंबई येथील जतन शाखेकडून किल्ल्याच्या कामाची चौकशी करण्यात येत आहे. या समितीत तीन अधिकारी व दोन अभियंते असा पाच जणांचा समावेश आहे.

धारूर किल्ल्याच्या डागडुजीसाठी सात कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतर पुरातत्व विभागाने डागडुजीचे काम औरंगाबादच्या गायत्री कंन्ट्रक्शनला दिले होते. या कंपनीने डागडुजी केल्यानंतर ५ वर्ष देखभालीची जबाबदारी गुत्तेदाराची होती. परंतु, पाच वर्षांतच म्हणजे तीन महिन्यांत तीन भिंती कोसळल्या. खारी दिंडीकडील तटबंदी जून महिन्यात टाकसाळ बुरूजाजवळील भिंत ऑगस्ट महिन्यात तर प्रवेशद्वाराच्या पश्चिमेकडील भिंतही ढासळली आहे. तर किल्ल्यातील चौथी भिंत फुगली असून धोकादायक बनली आहे. ढासळलेल्या सर्व भिंतीत मुरूम, दगडाऐवजी मोठ्या प्रमाणात माती निघाली आहे. इतर भिंतीलाही तडे जात आहेत. ‘दिव्य मराठी’ने हा विषय लावून धरल्याने किल्ल्याच्या डागडुजीचे त्रयस्थ समितीकडून लेखा परीक्षणाच्या हालचाली सुरू झाल्या.

जतन शाखेमार्फत चौकशी

धारूर येथील किल्ल्यातील डागडुजी केलेल्या कामाची देखभाल करण्याची जबाबदारी गुत्तेदाराची आहे. ढासळलेल्या भिंती पुन्हा बांधून देण्याची जबाबदारी गुत्तेदाराची असून झालेल्या डागडुजीचे जतन शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. तेजस गर्गे, संचालक, पुरातत्त्व विभाग.