आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमवेत रविवारी (३१ जुलै) सकाळी ८ वाजेपासून जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई आदी तालुक्यांचा दौरा करणार आहेत. जिल्ह्यात पावसाने व किडीच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या पिकांची ते थेट बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते लातूरला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी दिली.
अजित पवार व माजी मंत्री धनंजय मुंडे हे रविवारी सकाळी ९ वाजता प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन या दौऱ्याची सुरुवात करतील. गोगलगाय व अन्य किडीच्या प्रादुर्भावाने सोयाबीनसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले. तर काही ठिकाणी बियाणे उगवलेच नाही, तर काही ठिकाणी अधिकच्या पावसाने शेतात पाणी साठलेले आहे. कोणत्याही परिस्थितीत बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. विरोधी पक्षनेते पवार व मुंडे हे मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून त्यांना आधार देण्यासाठी सरसावले. परळीनंतर सकाळी १०.१५ वाजता जवळगाव (ता. अंबाजोगाई) येथील पीक नुकसानीची पाहणी करून स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधतील. ते शेतकरी प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी यांची परळी व अंबाजोगाई येथे निवेदने स्वीकारून त्यांच्याकडून तालुकानिहाय माहिती घेतील. अंबाजोगाईवरून पुढे ते लातूरमार्गे मुंबईकडे प्रयाण करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.