आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस:अंबाजोगाईत भरारी पथकाद्वारे कृषी सेवा केंद्रांची केली तपासणी‎; कृषी सेवा‎ केंद्र चालकांना नोटीस

अंबाजोगाई‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई तालुक्यातील कृषी सेवा‎ केंद्र चालकाकडून खतासाठी व‎ बियाण्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक‎ होऊ नये म्हणून तालुका कृषी‎ अधिकारी व पंचायत समिती कृषी‎ अधिकारी यांच्या संयुक्त भरारी‎ पथकाद्वारे अंबाजोगाई, घाटनांदुर,‎ बर्दापुर येथील कृषी सेवा केंद्राची‎ बुधावारी तपासणी करण्यात आली.‎ तपासणीमध्ये बऱ्याच त्रुटी आढळून‎ आल्या.

त्याबाबत संबंधित कृषी सेवा‎ केंद्र चालकांना नोटीस बजावण्यात‎ आल्या असून काही निविष्ठांची विक्री‎ बंद आदेश देण्यात आले आहेत. आठ‎ दिवसात सुधारणा न केल्यास‎ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात‎ येणार असल्याचे पथक प्रमुख तथा‎ तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत‎ वडखेलकर यांनी सांगितले.‎ तपासणी दरम्यान दर्शनी भागात‎ दरफलक न लावणे, शिल्लक साठा‎ नोंदवही व्यवस्थित न ठेवणे इत्यादी‎ त्रुटी आढळून आल्या, तसेच यावर्षी‎ बरेच शेतकरी सोयाबीनचे घरचे बियाणे वापरत आहेत परंतु काही दुकानदार बियाणे घेतले तरच रासायनिक खते‎ घेणे बाबत आग्रह करत असल्याचे आढळून आले, त्यांनाही समज देण्यात ‎आली.

तालुक्यातील कृषी सेवा केंद्रा‎ कडे रासायनिक खताची मोठ्या‎ प्रमाणात उपलब्ध असून माननीय‎ जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार‎ येत्या दोन दिवसात तालुक्यात १०५ टन ‎ ‎ डीएपी व ७५ टन उपलब्ध करून‎ देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी खते व‎ बियाणे साठी विशिष्ट कंपनीचा आग्रह‎ धरू नये तसेच खते बियाणे खरेदी ची‎ पक्की पावती घ्यावी. ज्यादा दराने विक्री‎ होत असल्यास कृषी विभागाकडे तक्रार‎ करावी असे सांगितले .कृषी केंद्र‎ तपासणी वेळी तालुका कृषी अधिकारी‎ श्री वडखेलकर यांच्यासोबत पंचायत‎ समिती कृषी अधिकारी श्री अविनाश‎ मोरे, मंडळ कृषी अधिकारी गोविंद‎ ठाकूर, कृषी सहाय्यक राठोड उपस्थित‎ होते.‎

बातम्या आणखी आहेत...