आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीच्या तयारीचा आढावा गुरुवारी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घेतला. पोलिस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखांना भेटी देत त्यांनी पाहणी केली. शिवाय, कार्यालयाच्या परिसराची पाहणी करुन स्वच्छतेच्या सूचनाही दिल्या. विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून केल्या जाणाऱ्या वार्षिक तपासणी दरम्यान पोलिस दलातील शिस्त दिसून यावी, कुठेही कमतरता राहू नये, इमारत आणि कार्यालयांची स्वच्छता असावी या दृष्टीने काम केले जात आहे.
गुरुवारी रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखा तसेच पत्रव्यवहार शाखा यासह अन्य विभागांना भेटी देवून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, गृह विभागाचे प्रभारी उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
एस पी ठाकूर यांनी स्थानिक गुन्हे शाखा, सायबर शाखा, भरोसा सेल, एएचटीयू, आर्थिक गुन्हे शाखेला भेट देऊन त्यांनी अधिकार्यांना सूचना करत संचिका व दस्ताऐवज सुस्थितीत ठेवावा, सर्व रेकॉर्ड व्यवस्थित जतन करावे तसेच भिंतीच्या खिडक्यांना लावलेली कापडी पडदे स्वच्छ करून घ्यावेत यासह कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवावा या व इतर सूचना दिल्या. येत्या १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान जिल्हा पोलिस दलाची विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम.मलिकार्जुन प्रसन्ना यांच्याकडून वार्षिक तपासणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दल सर्व संचिका तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखा आणि जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील दस्ताऐवज सुरक्षित व सुस्थितीत ठेवण्यासाठी कामाला लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.