आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक:राजे मल्हारराव होळकर यांची प्रेरणा घेत समाजाच्या प्रश्नासाठी बांधवांनी एकत्र यावे; }माजलगाव येथील कार्यक्रमात होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांचे प्रतिपादन

माजलगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी साम्राज्याचे अटकेपार झेंडे फडकवण्यासाठी आदिलशाहीच्या विरोधात आणि देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांच्या विरोधात होळकर शाही लढाई लढल्या आहेत. असा धनगर समाजाचा गौरवशाली इतिहास आहे. समाजाच्या विविध प्रश्नांच्या आड येणाऱ्यांना गाडण्यासाठी समाजबांधवांनी राजे मल्हारराव होळकर यांची प्रेरणा घेऊन एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केले.

माजलगाव येथे मल्हार सेना प्रणित राजे मल्हारराव होळकर यांच्या जयंती उत्सव सोहळ्याचे रविवारी (ता.२७ मार्च २०२२) सायंकाळी ७ वाजता आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून होळकर हे बोलत होते. उदघाटक म्हणून भाजप नेते रमेश आडसकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम येवले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन मुक्ती मोर्चाचे नेते बाबुराव पोटभरे, रामनाथ मंडलिक, नगराध्यक्ष शेख मंजुर, धनगर समाज कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष अकुंशराव निर्मळ, माजी नगराध्यक्ष डॉ.अशोकराव तिडके, बबनराव सरवदे, अरूणराव राऊत, राजेश घोडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेशराव मोगरेकर, पत्रकार बंडु खांडेकर, व्याख्याते लक्ष्मणराव नजान, रमेशराव गाडे, वसंतराव साबणे, दिलिपराव माने, ज्ञानेश्वर सरवदे, बाबुराव गोसावी, नगरसेवक शेख इमरान, बाळासाहेब सोनसळे, अकंशराव गाडगे, सरपंच शंकरराव आबुज, मोहनराव चोरमले, नारायण सातपुते, प्रा.लक्ष्मीकांत सोन्नर, डॉ.ज्ञानेश्वर गवते, भगवान वगरे, अहेमद तांबोळी आदी उपस्थित होते. राजे मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. उत्सव समितीच्या वतीने मान्यवरांचा पुष्पहार, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या वर्षीचे पुरस्काराने मानकरी रामनाथ मंडलिक यांना राजे मल्हारराव होळकर सामाजिक राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

बाबुराव पोटभरे, तुकाराम येवले, राजेश घोडे, लक्ष्मण नजान, रामनाथ मंडलिक, हर्षवर्धन डोणे यांचे समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक विलास नेमाणे यांनी केले तर सुत्रसंचालन लक्ष्मण सरवदे, आभार गोविंद गोचडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष सुभाषराव गवळी, अशोक डोणे, संतोष देवकते, प्रभाकर धरपडे, अनिल आवाड, दत्ता मुळे, विशाल देवकते, अशोक अर्जुन, बाबा वगरे, मंजुळदास कुंडकर, गणेश हजारे, विनायक सोनटक्के, बाळासाहेब दिवटे, गणेश काळे, पंडित वगरे, रामेश्वर शिगाडे, विकास आबुज, तुळशिराम कुरधणे हजर होते.

बातम्या आणखी आहेत...