आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेज तालुक्यातील धनेगाव येथील ३३ के. व्ही. विद्युत उपकेंद्रात ५ एमव्हिए क्षमतेचा नव्याने ट्रान्सफॉर्मर बसवून उपकेंद्रामधील मेंटेनन्सची सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत अन्यथा विद्युत उपकेंद्र बंद आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला.
धनेगाव उपकेंद्रातून धनेगाव, पाथरासह इतर अनेक गावे व अंबाजोगाई, केज, धारूर या पाणीपुरवठा योजनांसह येडेश्वरी साखर कारखान्यास वीजपुरवठा केला जात आहे. उपकेंद्रात शिटी, ब्रेकर, रिलेची कामे केलेली नसल्याने शेतकऱ्यांना पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. यामुळे पिकाचे नुकसान होत आहे. यामुळे राहुल खोडसे, विजयकुमार गुजर, मन्मथ गुजर, लिंबराज गुजर, विकास सोमवंशी, नितीन गुजर, उत्तम सोमवंशी, वामन खोडसे, पप्पू खोडसे आदींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.