आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षक:मांजरसुंबा घाटात संरक्षक जाळी बसवण्यास सुरुवात

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंबा घाटात सध्या पावसाळ्यात दरडी कोसळू नयेत म्हणून संभाव्य धोका ओळखून महामार्गाच्या कंत्राटदाराकडून तारेची संरक्षक जाळी बसवण्याचे काम सुरू आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात दरडी कोसळून अपघात घडू नयेत म्हणून सध्या दरडीच्या ठिकाणी संरक्षक जाळी बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या घाटात वाहने अत्यंत सावकाश वेगाने जातात.

घाटात विजेचे पथदिवे नसल्यामुळे चोरीच्या घटना वाढत आहेत. त्या टाळण्यासाठी पथदिवे बसवण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व औरंगाबाद येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...