आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआता आपले पदाधिकारी व कार्यकर्ते नाचगाण्यांचे कार्यक्रम आयोजित करतात काही तर डिजिटल फ्लेक्स लावतात हे करण्यापेक्षा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेले शैक्षणिक, समाजोपयोगी उपक्रमाचे जास्तीत जास्त अायाेजन करा असे सांगत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी येथे कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले. शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत शुक्रवारी नगरसेवक महादेव जाधव यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांनी आपल्या खास शैलीत कार्यकर्त्यांना फटकारले. यंदा जिल्ह्यात स्कॉलरशिप परीक्षेत ५०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन त्यातील अडीचशे विद्यार्थी आष्टी- पाटोदा - शिरूर तालुक्यातील असल्याने याचा मला अभिमान आहे.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा हायेस्ट स्कोअर १४७ आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना २६२ हा स्कोर आहे. शिक्षकांनी आता शैक्षणिक वातावरणाकडे व गुणवत्तेकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. इतर कामांसाठी ज्याप्रमाणे आपण वर्गणी गोळा करता त्या प्रमाणे जिल्हा परिषद शाळेच्या उपयोगासाठी देखील अशा प्रकारचे लोक सहभागातून काम करण्याची गरज आहे.शाळा आपले मंदिरच असुन जिल्हा परिषद शाळांमध्ये गरीबांची लेकर शिक्षण घेतात त्यामुळे शिक्षकांनी देखील गुणवत्तेकडे लक्ष देऊन आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे कारण पुढच्या पिढीचे नुकसान होऊ नये ही भावना सर्वत्र असली पाहीजे असे आमदार धस यांनी सांगीतले. धस यांनीच विधायक कार्यात लक्ष घालण्याच्या सूचना दिल्याने याची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली.
परीक्षांच्या पूर्वतयारीचे उपक्रम ठेवावेत सध्या काही ठिकाणी नेत्यांच्या वाढदिवसाला नाचगाण्यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. काही ठिकाणी डिजिटल फ्लेक्स फ्लेक्स वरही हजारो लाखो रुपयांचा खर्च केला जातो. त्याऐवजी विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी कशी करावी अशा प्रकारचे उपक्रम राबवा असे आमदार धस यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. शहरी भागातील शाळा या नगरपंचायत हद्दीत आल्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेकडून मिळणाऱ्या योजनेबाबत आपण सभागृहात आवाज उठवणार असल्याचेही आमदार धस यांनी यावेळी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.