आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपाद:प्रतिनिधित्व मिळाले नसले तरी जनसेवेत अखंड; झेडपीचे माजी अध्यक्ष पंडित यांचे प्रतिपाद

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली नसली तरी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत आणि सुरू आहेत. मात्र ज्यांच्यावर मतदारसंघाने विश्वास टाकला, जबाबदारी टाकली, ते मतदारांना तोंड दाखवायला तयार नाहीत. विरोधासाठी विरोध म्हणून खोटेनाटे आरोप करण्याचा सपाटा विरोधकांनी लावला आहे. त्यांना थारा देऊ नका, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले.

गोंडगाव येथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तीस लक्ष रुपये किमतीच्या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, दत्ता संत, बप्पासाहेब सोलाट, नाना घाटुळ, सुनिल देशमुख, दत्ता सोलाट, राजेंद्र सोलाट, अमन सोलाट, वसंत पवार, शामराव पवार, मुन्ना गायके, कृष्णा राठोड, बळीराम जाधव, पवन राठोड, शेख हमीद, ताराचंद राठोड, माणिक राठोड, बबन गांडुळे, कल्याण सोलाट, छगन सोलाने, अशोक सोलाट यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना पंडित यांनी सत्ता असो नसो लोकांच्या सदैव संपर्कात राहिले पाहिजे हे शिवछत्र परिवाराचे संस्कार आहेत, असेही सांगितले. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...