आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पूर्णवादी बँक सचालकांसह सभासदांशीही साधणार संवाद; शिवरामचे अध्यक्ष डॉ. पारनेरकर आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर

बीड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर हे १७ ते १९ जूनपर्यंत तीन दिवसांच्या मराठवाड्यातील बीड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्णवादी बँकेचे संचालक, पूर्णवादी परिवार, प्रतिष्ठित नागरिक, बँकेचे सभासद, खातेदार, हितचिंतक आणि गुरुबंधू यांच्याशी डॉ. पारनेरकर संवाद साधणार आहेत.

शुक्रवारी (१७ जून) दुपारी १ वाजता शिवराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर आष्टी येथील पूर्णवादी बँकेच्या शाखेत सभासद, पूर्णवादी परिवार आणि प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद साधतील. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता बीड येथील पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची संवाद सभा बीड शहरातील हॉटेल अन्विता येथे घेणार आहेत.

या वेळी पूर्णवादी बँकेचे अध्यक्ष डॉ.अरुण निरंतर उपस्थित राहतील. शनिवारी (१८ जून) लातूर येथील पूर्णानंद मंगल कार्यालय सावेवाडी येथे सकाळी ११ वाजता सभासद, पूर्णवादी परिवार आणि प्रतिष्ठित नागरिकांशी ते संवाद साधतील. त्यानंतर परळी शहरातील डॉ. गुरुप्रसाद देशपांडे यांच्या निवासस्थानी दुपारी तीन वाजता भेट देणार असून सायंकाळी सहा वाजता परभणी येथील हॉलिडे फनपार्क व रिसॉर्ट, महिंद्रा शोरूम रोड एमआयडीसी येथे सभासद, पूर्णवादी परिवार आणि प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद साधतील. रविवारी (१९ जून) दुपारी एक वाजता जालना येथील सर्वज्ञ हॉल, उड्डाणपुलाखाली, भाग्यनगर, जुना जालना येथे सभासद, पूर्णवादी परिवार आणि प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद होणार आहे. तर सायंकाळी ६ वाजता औरंगाबाद येथील यशोमंगल कार्यालय, पन्नालालनगर, औरंगाबाद येथे सभासद, पूर्णवादी परिवार आणि प्रतिष्ठित नागरिकांशी डॉ. पारनेरकर संवाद साधणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...