आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिसंवाद‎:केएसके महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद‎

बीड‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सौ. केशरबाई सोनाजीराव‎ क्षीरसागर उर्फ काकू कला विज्ञान व‎ वाणिज्य महाविद्यालयात १७ व १८ मार्च‎ रोजी इंग्रजी विभागातर्फे ''न्यू ट्रेंडर्स अँड‎ नँरेटिव्हस इन इंग्लिश लिटरेचर'' या‎ विषयावरील आंतरराष्ट्रीय परिसंवाद‎ परिषदेचे आयोजन इंग्रजी विभाग‎ प्रमुख तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य‎ डॉ.प्रा. शिवाजी शिंदे यांच्या‎ संयोजनातून केले आहे.‎ परिषदेचे उद्घाटन नवगण शिक्षण‎ संस्थेच्या उपाध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.‎ दीपा भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते‎ होणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख‎ पाहुणे म्हणून अमेरिकेतील बिग्रॅहम्टन‎ विद्यापीठाच्या प्रा.जैमी रिस्टन कोलबर्ट‎ आणि या प्रमुख प्रवक्ते म्हणून जवाहर‎ नेहरू विद्यापीठातील प्रा.डॉ.शरद‎ बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती‎ लाभणार आहे. या दोन दिवसीय‎ परिसंवादात पहिल्या दिवशी १७ मार्च‎ रोजी तीन सत्र होणार असून पहिल्या‎ सत्राचे वक्ते डॉ. दिनेश कुमार नायर व‎ अध्यक्ष म्हणून डॉ. अब्दुल अनिस‎ असणार आहेत. दुसऱ्या सत्राचे वक्ते‎ म्हणून डॉ.प्रो.एस.मरिथाई व अध्यक्ष‎ डॉ. चौथाईवाले असणार आहेत आणि‎ तिसऱ्या सत्राचे वक्ते डॉ. विष्णू पाटील‎ व अध्यक्ष विष्णू चव्हाण असतील. या‎ परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी देखील‎ तीन सत्र होणार आहेत पहिल्या सत्राचे‎ वक्ते प्रा.डॉ. उत्तम अंभोरे आणि‎ अध्यक्ष डॉ.विवेक मिरगणे असणार‎ आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...