आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील के.एस.के. अन्नतंत्र महाविद्यालय येथे रोजी या कंपनीचा कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन महाविद्यालयामध्ये करण्यात आलेले होते. निवड प्रक्रियेमध्ये महाविद्यालयाच्या अंतिम सत्रातील ४९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. इंडस मशरुम फार्म एलएलपी कंपनी ही मशरुम आधारीत नामांकित व अग्रगण्य कंपनी असून मशरुम निर्मिती मध्ये मोलाची कामगिरी बजावत आहे. सदरील कंपनीचे कार्य हे महाराष्ट्रात आहे सध्य परिस्थितीत महाविद्यालयाच्या अथक पाठपुराव्यातून इंडस् मशरुम फार्म एल.एल.पी कंपनीला आमंत्रित करण्यात आले होते.
या कॅम्पस मुलाखतींना चांगला प्रतिसाद मिळाला. ४९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यातील काही विद्यार्थ्यांची निवड झाली. या यशामध्ये विद्यार्थ्याचे अभिनंदन संस्थेचे सचिव माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, सहसचिव डॉ. गोविंद साळूंके, प्राचार्य डॉ. झेड. एच. सय्यद प्लेसमेंट सेल प्रमुख प्रा. के.एम. चक्रे, प्रा.एस.ए. डोंगरे, प्रा. व्ही. पी. राऊत तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून स्वागत केले.
महाविद्यालय परिसरात घेतलेल्या मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांची निवड प्रोडक्शन ऑफीसर, कॉलीटी इंचार्ज म्हणून करण्यात आलेली आहे. नियमित होणाऱ्या तासिका तसेच प्रात्यक्षिक वर असणारा भर जाणवतो असे उद्गार कंपनीचे सिनियर मॅनेजर प्रशांत घाडगे आणि महादेव पोकळे यांनी काढले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.