आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील खुंटेफळ साठवण तलावाच्या उपसा सिंचन योजनेला १४६८ कोटीचा निधी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंजूर केला असुन येत्या आठ दिवसात या कामांची निविदा निघणार असुन हे काम लवकर सुरू होणार असून तालुक्यातील ७० गावातील ८१४७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार माहिती आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिली. आष्टी तालुक्याचा जिव्हाळ्याचा असलेला खुंटेफळ साठवण तलावा बाबत गुरूवार २३ जुन २०२२ रोजी मंत्री मंडळात निर्णय होऊन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या आदेशाने उपसा सिंचन योजनेसाठी एक हजार ४६८ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
आमदार बाळासाहेब आजबे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे कृष्णा मराठवाडा प्रकल्पांतर्गत टप्पा क्रमांक ३ आष्टी उपसा सिंचन योजनेची पाइपलाइन निविदा प्रसिद्ध करून काम हाती घ्यावे, तालुक्यातील सर्व प्रकल्पाच्या कॅनॉलची दुरुस्ती विस्तार व सुधारणा कामास मंजुरी द्यावी, सिंदफणा मध्यम प्रकल्पाच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन काम पूर्ण करावे, आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील १९६५ पूर्वीच्या धरणातील गाळ साचल्याने या गाळाच्या बदल्यात जुन्या जलसंपदा प्रकल्पाची उंची वाढण्याची कामे हाती घेण्यात यावे, सीना, कडी नदी व पाटोदा तालुक्यातील मांजरा नदीवरील व शिरूर तालुक्यातील सिंदफणा नदी केटीवेअरचे रूपांतर लातूर टाइप बॅरीगेजमध्ये करण्यासाठी प्रशासकीय मान्यता द्यावी, मेहकरी धरणा पुढील क्षेत्रात जाणाऱ्या पुंडी गावाजवळील पुलाची उंची वाढण्याची निविदा प्रसिद्ध करून मंजुरी द्यावी, सुधारित थेट पाइपलाइनद्वारे आष्टी उपसा सिंचन योजनेस मंजुरी द्यावी, खुंटेफळ साठवण तलावाचे काम सुरू करण्यास तात्काळ मंजुरी द्यावी. दरम्यान, गुरुवारी उपसा सिंचन योजना मार्गी लावत या योजनेस निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही जयंत पाटील यांनी प्रामुख्याने सांगितले.
त्यामुळे आष्टी उपसा सिंचन योजनेचे थेट पाइपलाइनचे व खुंटेफळ साठवण तलावाचे काम सुरू होणार आहे. लवकरच आष्टी उपसा सिंचन योजना पूर्ण होऊन मराठवाड्याला हक्काचे १.६८ पाणी मिळणार असून मतदारसंघाचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटणार आहे या प्रकल्पामुळे ८१४७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचे आ.बाळासाहेब आजबे यांनी शेवटी सांगितले.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे मानले आभार
खुंटेफळ साठवण तलावाच्या उपसा सिंचन योजनेमुळे आष्टी तालुक्यातील ७० गावे ओलिताखाली येणार असून याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. आमदार बाळासाहेब आजबे यांनी मंत्री जयंत पाटील यांचे आभार मानले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.