आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सोमवारी आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याने जिल्ह्यातील सर्वच पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांनी मंत्री सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दिव्य मराठीशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
महिला सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू
महिलांबद्दल अशा प्रकारचे अपशब्द वापरणारे अब्दुल सत्तार यांना आम्ही राज्यात फिरू देणार नाही. सत्तार यांना बांगड्या घालून त्यांच्या तोंडाला काळे फासणार आहोत. महिलांबद्दल बोलताना मंत्र्याची अशा प्रकारे जीभ अशी घसरतेच कशी? त्यांची तत्काळ हकालपट्टी झाली नाही तर महिला सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करणार आहे.-वर्षा जगदाळे, मनसे, राज्य उपाध्यक्ष, महिला आघाडी.
आपण कोणाबद्दल बोलतो याचे भान ठेवावे
सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याचा एक महिला पदाधिकारी म्हणून जाहीर निषेध करते. लायकी नसतानाही मंत्रिपद आले की माणूस अशी वायफळ बडबड करतो. जबाबदारी सोडून अशा प्रकारे बेजबाबदारपणे व्यक्त होणे त्यांना शोभत नाही. आपण कोणाबद्दल बोलतो याचे भान सत्तारांना नसावे. मी महिला म्हणून त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करते. -प्रज्ञा खोसरे, सदस्य, म. रा. बालहक्क संरक्षण आयोग.
महिलांचा सन्मान राखलाच पाहिजे
पक्ष व पद कोणतेही असो, स्त्रीचा सन्मान आणि आदर प्रत्येकानेच केला पाहिजे. अब्दुल सत्तार हे तर मंत्री आहेत. त्यांच्याकडून महिलांच्या बाबतीत असे वक्तव्य होणे योग्य नाहीच. महिलांच्या बाबतीत सन्मानाने बोलले पाहिजे असे मला वाटते. -अॅड. संगीता धसे, पदाधिकारी, भाजप.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.