आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आपत्ती व्यवस्थापनासाठी आता आयआरएस प्रणाली‎

बीड‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळात तत्काळ प्रतिसाद‎ देण्याकरता आपत्ती व्यवस्थापन, मदत‎ व पुनर्वसन विभाग आणि जिल्हा‎ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या‎ वतीने संयुक्तरीत्या आयोजित घटना‎ प्रतिसाद प्रणाली कार्यान्वित‎ करण्यासाठी विविध विभागातील‎ अधिकारी, कर्मचारी यांना शासकीय‎ तंत्रनिकेतन, येथे नुकतेच प्रशिक्षण‎ देण्यात आले.‎‎ जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा‎ यांनी या प्रशिक्षणाला प्रत्यक्ष भेट देवून‎ या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींना‎ कशाप्रकारे माहिती देण्यात आली‎ याबाबतचा आढावा घेतला.

तसेच या‎ प्रशिक्षणाचा उपयोग आपत्तीच्या‎ काळात जास्तीत जास्त काळजीपूर्वक‎ व चांगल्याप्रकारे कसा करता येईल‎ याबाबत सूचनाही जिल्हाधिकारी यांनी‎ प्रशिक्षणार्थींना दिल्या.‎ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन‎ प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी‎ अधिकारी तथा निवासी‎ उपजिल्हाधिकारी संतोष राऊत,‎ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी‎ राज दीप बनसोड, राज्य आपत्ती‎ व्यवस्थापन दलाचे कमांडिंग‎ अधिकारी ब्रिजेश शर्मा जिल्ह्यातील‎ पोलिस, जिल्हा परिषद, नगर परिषद,‎ आरोग्य, जिल्हा रुग्णालय,‎ अग्निशमन दल, माहिती कार्यालय‎ आदी श्हरातील विविध विभागांचे‎ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.‎अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रक्षिक्षण वर्गास भेट देऊन जिल्हाधिकारी शर्मा यांनी आढावा घेतला.‎

आपत्ती व्यवस्थापनाची शर्मांनी दिली माहिती : यावेळी प्रशिक्षण देणारे अधिकारी ब्रिजेश शर्मा‎ यांनी आपत्तीच्या काळात तात्काळ प्रतिसाद मिळण्यासाठी तंत्रज्ञान प्रणालीचा वापर कशाप्रकारे‎ करायचा व या सॉफ्टवेअरमध्ये माहिती कशी सादर कराची याबाबतची माहिती या प्रशिक्षणाव्दारे दिली.‎

बातम्या आणखी आहेत...