आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम‎:समाजाने एड्सबाधितांकडे बघण्याचा‎ दृष्टिकोन बदलणे आवश्यक : राठोड‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काळ बदलतो आहे, त्यानुसार‎ विविध विषयातील आपले‎ गैरसमज दूर होत आहेत. एड‌्स‎ बाधितांकडे बघण्याचा सामाजिक‎ दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे‎ असे प्रतिपादन राम राठोड यांनी‎ केले.‎ येथील माऊली विद्यापीठ‎ संचालित , महिला कला‎ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा‎ योजना विभागाद्वारे जागतिक‎ एड्स दिनानिमित्त कार्यक्रमाचे‎ आयोजन करण्यात आले होते.‎ अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सविता‎ शेटे या होत्या. व्यासपीठावर‎ रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.सुनंदा‎ आहेर यांची प्रमुख उपस्थिती‎ होती. प्रमुख पाहुण्यांचा परिचय‎ डॉ. संध्या आयस्कर यांनी करून‎ दिला.

यावेळी राम राठोड यांनी‎ सर्वप्रथम एचआयव्हीचा प्रसार‎ कसा होतो? एड्स बाधित‎ व्यक्ती, तिचे कुटुंब आणि‎ बाधितांकडे बघण्याचा समाजाचा‎ दूषित दृष्टिकोन यातून‎ उद्भवणाऱ्या समस्या ताण‎ -तणाव यांची सोदाहरण उकल‎ केली. व्यक्तीचे अनैतिक वर्तन‎ वेश्याव्यवसाय, यातून होणारा‎ एड्सचा प्रसार याबाबत माहिती‎ दिली. अध्यक्षीय समारोपात‎ प्राचार्य डॉ. सविता शेटे यांनी‎ एड्सचे वाढते प्रमाण याची उकल‎ केली. एड्स बाधित्यांची संख्या‎ वाढण्याची, बाधा होऊ नये म्हणून‎ काय काळजी घेतली पाहिजे याची‎ मांडणी केली. सूत्रसंचालन करुन‎ रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.सुनंदा‎ आहेर यांनी आभार मानले.‎ महाविद्यालयाच्या परंपरेनुसार‎ प्रमुख पाहुणे डॉ. राम राठोड यांना‎ प्राचार्य डॉ.सविता शेटे यांच्या‎ हस्ते ग्रंथ भेट देण्यात आला.‎ कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील‎ सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक,‎ शिक्षकेतर कर्मचारी आणि रासेयो‎ स्वयंसेवक ,रासेयो सहाय्यक‎ कार्यक्रम अधिकारी डॉ. लक्ष्मण‎ तोंडाकूर यांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...