आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोषण माह:पोषण आहाराचे महत्त्व समाजात पोहोचवणे आवश्यक : डॉ. साबळे

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील महिला कला महाविद्यालय बीड येथील गृह विज्ञान विभागाद्वारा १ ते ३० सप्टेंबरदरम्यान आंतरराष्ट्रीय पोषण महिन्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमासाठी अध्यक्ष प्राचार्य सविता शेटे, उद्घाटक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून माहिती अधिकारी किरण वाघ उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते अन्न आणि पोषण या विषयावरील भित्तिपत्रक प्रकाशनाने झाली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून आंतरराष्ट्रीय पोषण महिन्याच्या अनुषंगाने आयोजित उपक्रम आणि नियोजन याबाबतची माहिती गृहविज्ञान विभागाच्या डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन म्हणाले, प्रत्येकाने आपल्या दैनंदिन आहारात लोह, जीवनसत्त्व, उष्मांक, कार्बोदके पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. पोषण ही संकल्पना प्रत्येक वयोगटासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या अनुषंगाने शासनाने पोषण आहार शालेय विद्यार्थ्यांसाठी योजना सुरू केली आहे, जेणेकरून मुलांचे आरोग्य सुदृढ राहील आणि रोगप्रतिकारशक्ती वाढेल. आपल्या भारत देशात पोषण व्यवस्थित होत नसल्यामुळे पोषणाअभावी होणारे आजार दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने अ‍ॅनिमिया हा होय. स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक दिसून येते ते म्हणजे गर्भावस्थेत. त्यामुळे सर्वांनी समतोल आहार घेणे आवश्यक आहे. अशा उपक्रमातून पोषण आहाराचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

माहिती अधिकारी किरण वाघ म्हणाले, समाजात पोषणविषयक जाणीव, जागृती निश्चित होईल असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सविता शेटे यांनी पोषण प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे, आपला आहार सर्व अन्नघटकयुक्त असावा. आहार आणि आरोग्याचा जवळचा संबंध कसा आहे हे सांगून उत्तम स्वास्थ्यासाठी प्रत्येकाने समतोल आहार घ्यावा असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार गृहविज्ञान विभागाच्या डॉ. संध्या अयस्कर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...