आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:प्रपंच करताना देव आणि संतांची सेवा करणे गरजेचे

नगवण राजूरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रपंच करत असताना देवाची आणि संतांची सेवा करणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन प्रकाश महाराज साठे यांनी केले. बीड तालुक्यातील नवगण राजूरी येथे सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात ते बोलत होते. यावेळी आचार्य अमृतस्वामी महाराज , अर्जुन क्षीरसागर, अक्षय महाराज पिंगळे, गणेश ससाणे, भगवान बहिर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रकाश महाराज साठे म्हणाले, की फक्त प्रपंच करत असताना परमार्थाची कास सोडू नये. देवाची सेवा जशी महत्वाची आहे तशी संतांची सेवा महत्वाची आहे. आधी संताची सेवा करा देवाची सेवा आपोआप घडेल. संत चोखामेळा यांच्या पत्नीचे बाळंतपण खुद्द देवाने नारी रूप घेऊन केले त्यासाठी त्यासाठी देवावर अगाध निष्ठा आपल्या अंगी ठेवणे आवश्यक आहे.

घरी आलेल्या अतिथीला आधी अन्न पाणी देण्याचे काम करावे, त्यामुळे देवही प्रसन्न होतो व संतही. प्रपंच सार व हा परमार्थ या दोन्ही मधील अंतर संत सेवेने कमी होते व दोन्ही यशस्वी होतात पण हे करत असताना पूर्ण निष्ठेने श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी हे महत्वाचे आहे. या वर्षी तरुण वर्ग मोठ्या संख्येने सप्ताहास उपस्थतीत आहे. तरुणांनी आपले आपले आचरण शुद्ध ठेवले पाहिजे व्यसनापासून दूर राहून संतांच्या मार्गदर्शनाखाली आपले आयुष्य सत्कारणी लावावे असेही प्रकाश महाराज साठे यावेळी बोलताना म्हणाले. किर्तनास राजूरी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येेने उपस्थिती होती. सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...