आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:ज्ञानाची खोली मोजता येणे शक्य नाही ; साध्वी किरणसुधाजी महाराज

बीड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनावश्यक वस्तूंमध्ये विद्युतसुद्धा जोडली आहे. तिचा विरह क्षणभर काळही माणूस सहन करत नाही. ती मिळवण्यासाठी तो परत आटोकाट प्रयत्न करत असतो. कारण त्याला अंधारात राहणे पसंत असत नाही. मनाच्या अंत:करणातील प्रकाशाकडेही आपण लक्ष द्यायला पाहिजे. ज्ञानाची खोली अपरिमित आहे. त्यामुळे प्रत्येकाने ज्ञान मिळवण्यासाठी वेळ दिला पाहिजे, असे प्रतिपादन साध्वी किरणसुधाजी महाराज यांनी केले.

बीड येथे साध्वी किरणसुधाजी महाराज यांचे चातुर्मासकालीन प्रवचन झाले. याप्रसंगी त्या बोलत होते. त्या म्हणाल्या की, परमेश्वराच्या देवालयातही अखंड नंदादीप प्रज्वलीत होत असतो. तसा मनाच्या मंदिरात, अंत:करणाच्या देवालयात तनरूपी देऊळातही नंदादीप तेवत ठेवायचा आहे. अर्थात हा नंदादीप ज्ञानाचा प्रकाशित करायचा आहे. त्यामुळे हृदय, आत्मा, मन जे अंध:कारात आहे, अज्ञानाच्या गर्तेत आहे, त्याची त्याविषयी कसलीही तक्रार नाही त्याच्या उन्नतीसाठी ज्ञानाच्या प्रकाशातून अग्रेषित व्हायचे आहे. म्हणून महावीराची स्तुती करायची आहे, असे साध्वी किरणसुधाजी महाराजांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...