आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवश्यक‎:शरीर सुदृढ व निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने‎ नियमित योगासने करणे अतिशय आवश्यक‎

केज‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

योगाचे महत्व पटल्याने अलीकडे‎ सर्वजण योगाकडे वळले आहेत.‎ अनेक आजार व रोग योगासनामुळे‎ निघून जात असल्याने आपले शरीर‎ हे निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी‎ प्रत्येकांनी नियमितपणे योगासने‎ करावीत.

असे आवाहन केज कृषी‎ उत्पन्न बाजार समितीचे माजी‎ अध्यक्ष अंकुश इंगळे यांनी केले.‎ केज शहरात विजय स्पोर्टस्‎ अकॅडमीच्या वतीने सुरू करण्यात‎ आलेल्या योगा प्रशिक्षण केंद्राचे‎ उदघाटन केज कृषी उत्पन्न बाजार ‎समितीचे अध्यक्ष अंकुश इंगळे‎ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी‎ ते बोलत होते. कार्यक्रमाच्या ‎अध्यक्षस्थानी राहुल देशमुख हे तर ‎प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. वासुदेव ‎ नेहरकर, सोमनाथ गुंड, दिलीप ‎ ‎ गुळभिले, अशोक मस्के, संजय‎ गुंड, नेहरकर, ठोंबरे, बोरडे, पत्रकार ‎अजय भांगे, तळेकर, तोंडसे, मुंडे‎ यांची प्रमुख उपस्थिती होती.‎

मान्यवरांच्या हस्ते ओम प्रतिमेचे‎ पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात‎ झाली. यावेळी योग शिक्षीका जयश्री‎‎ गुंड यांनी योगाचे विद्यार्थ्यासमवेत‎ प्रात्यक्षिक करून दाखवले.‎ कार्यक्रमाचे प्रस्ताविक क्रिडा‎ संयोजक विनोद गुंड यानी केले.‎ सुत्रसंचालन गिरी यांनी तर आभार‎ ठोबरे यांनी मानले. कार्यक्रमास‎ श्रीमती कोरडे, बोरडे, घुले,‎ डोईफोडे यांच्यासह अनेक शाळेचे‎ शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...