आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री शिंदे हेच गद्दार त्यामुळे ते कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेतील अशी अपेक्षा नाही. चोरी करायला 40 चा आकडा लागतो, उद्धव ठाकरे आणि माझे मास्क घालून एकनाथ शिंदे मतदारांपुढे गेले असा घणाघात आदित्य ठाकरेंनी बीडमध्ये बोलताना आज केला आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या बीड जिल्हा दौऱ्याला पाडळसिंगी येथून सुरुवात झालीय. या दौऱ्या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी बीडच्या गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी शिवारात नुकसानग्रस्त कापसाच्या पिकांची पाहणी केली आहे. आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. तर यावेळी आदित्य ठाकरें समोरच कृषी मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. बीड जिल्ह्यात कृषीमंत्री आले. मात्र त्यांचा दौरा केवळ महामार्गा पुरताच मर्यादित होता. असे गाऱ्हाणे शेतकऱ्यांनी ठाकरें पुढे मांडले. तर सध्या राज्यात चित्रपटावरून वादंग निर्माण झाला असताना ठाकरेंनी यावर भाष्य करत महाराष्ट्रात यावर वाद न करता हा प्रश्न मिटवावा असे म्हटले आहे.
मी गेली अनेक दिवस शेतकऱ्यांना भेटतोय त्यांना कृषिमंत्री कोण आहेत माहिती नाही. सरकारकडून कसलीच मदत करण्यात आलेली नाही, घोषणा करण्यात आली नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर केली आहे. सुप्रिया सुळे यांच्यावर केलेली टीका अतिशय चुकीचे आहे, असे म्हणताना सत्तार केवळ दौरा करताना महामार्गावरून निघून जात आहे असे मला अनेक शेतकऱ्यांनी सांगितले असे ही आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे.
11 तारखेला राहुल गांधीसोबत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहे, अशी माहिती आदित्य ठाकरेंनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
नाशिक, अकोला, बुलढाणा, पुणे असो की मराठवाडा सर्वच भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत झालेली नाही, शेतकरी त्रस्त असताना, रोजगार बाहेर जात असताना आणि महिला राज्यात सुरक्षित नसताना चित्रपटावर टीका करण्यापेक्षा निर्मात्याने दोन्ही बाजू ऐकून घेत त्यावर मार्ग काढायला हवा असेही आदित्य ठाकरेंनी म्हंटले आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.