आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:डीवायएफआयच्या अध्यक्षपदी जाधव

बीड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवक संघटनेच्या अंबाजोगाई तालुका अध्यक्षपदी देविदास जाधव आणि सचिव पदी प्रशांत मस्के तसेच खजिनदारपदी प्रदीप कोरडे यांची निवड करण्यात आली. डीवायएफआयचे जिल्हाध्यक्ष मोहन जाधव, जिल्हा सचिव विशाल देशमुख जिल्हा उपाध्यक्ष सुहास चंदनशिव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

उर्वरित कार्यकारणीत उपाध्यक्षपदी सचिन टिळक, जगन्नाथ पाटोळे, सहसचिवपदी रोहित देशमुख,विजय मेटे, सदस्यपदी विक्की आगळे, अतुल सोमवंशी, साबेर पठाण, राहुल भावठाणकर यांची नेमणूक करण्यात आली. यावेळी बोलताना मोहन जाधव, विशाल देशमुख यांनी म्हणाले, येणाऱ्या पुढील काळात सर्वांना बरोबर घेऊन विविध रोजगार, सामजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक क्षेत्रात कामे करण्यावर भर दिला जाईल.त्याचबरोबर नवीन कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...