आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमीन गैरव्यवहार प्रकरण:जगमित्र साखर कारखाना जमीन गैरव्यवहार; मंत्री मुंडे यांना जामीन, 2018 मध्ये दाखल गुन्हा, समन्सनंतर सोमवारी न्यायालयात झाले हजर

अंबाजोगाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पूस येथील प्रस्तावित जगमित्र साखर कारखान्याच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा नोंद असलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना अंबाजोगाई येथील दिवाणी न्यायालयाचे (वरिष्ठ स्तर) न्या.एस.व्ही. पाटील यांनी सोमवारी (४ एप्रिल) जामीन मंजूर केला.

अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील जगमित्र साखर कारखाना जमीन गैरव्यवहार प्रकरणात २०१८ मध्ये मुंजा गिते यांच्या फिर्यादीवरून धनंजय मुंडे यांच्यावर बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी न्यायालयासमोर हजर राहण्याबाबत समन्स निघाल्याने धनंजय मुंडे यांनी सोमवारी न्यायालासमोर स्वतः हजर होत जामिनासाठी अर्ज दाखल केला. याच प्रकरणातील अन्य दोन आरोपी वाल्मीक कराड आणि सूर्यभान मुंडे यांना मागील महिन्यातच न्यायालयाकडून जामीन मिळाला होता.

चेक न वटल्याने दाखल झाला होता गुन्हा
अंबाजोगाईतील तळणी गावात राहणाऱ्या मुंजा गिते यांची तीन हेक्टर जमीन जगमित्र साखर कारखान्यासाठी ५० लाखांत खरेदी केली होती. शेतकऱ्याला कारखान्याने अगोदर एक लाख आणि काही दिवसांनी ७ लाख ८१ हजार २५० रुपयांचा चेक दिला. शिवाय कारखान्यात गिते यांच्या मुलासह आणखी चौघांना हमीप्रमाणे नोकरीही दिली गेली. मुंडे यांच्यासाठी मुखत्यारपत्र वाल्मीक कराड आणि सूर्यभान मुंडे यांच्या नावावर करण्यात आले. त्यानंतर मात्र कारखान्याच्या नावे परळी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या नावाने असलेला ४० लाख रुपयांचा चेक गिते यांना देण्यात आला. मात्र तो चेक न वटल्याने गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...