आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभारंभ:जय भवानी कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ

बीड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या ४० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. याप्रसंगी सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख, श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपतीमहंत शिवाजी महाराज, संस्थापक शिवाजीराव पंडित यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या ४० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते व कारखान्याचे संस्थापक शिवाजीराव पंडित यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी मुख्य अतिथी म्हणून सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख उपस्थित राहणार आहेत.

जय भवानी साखर कारखान्याची गाळप क्षमता अडीच हजार हुन पाच हजार मेट्रिक टन प्रति दिन वाढवल्या नंतर हा पहिलाच गळीत हंगाम सुरू होत आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून यंत्रसामग्री मध्ये बदल करण्यात आले आहेत, मागिल वर्षी सर्वाधिक गाळपाचा विक्रम प्रस्थापित करून उसाला रास्त भाव दिला असल्यामुळे शेतकरी आनंदात आहे.

बातम्या आणखी आहेत...