आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:जय किसान विकास पॅनलने दणदणीत विजय; सोसायटीच्या संचालकांचा सत्कार

परळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बोधेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखालील जय किसान विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविला. पॅनलच्या १३ पैकी सात उमेदवारांनी बाजी मारत विजयश्री खेचून आणली.

विजयी उमेदवारांचा पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सत्कार केला. विजयी झालेले उमेदवार रुस्तुम गडदे, अन्नपूर्णा थिटे, सर्जेराव शिंदे, कौशल्याबाई मकर, शारदाबाई शिंदे, श्रीमंत रूपनर, बालासाहेब शेळके हे आहेत. दरम्यान, पॅनलच्या विजयासाठी रेशीम कावळे, विनायक गडदे, बळीराम गडदे, रामलिंग गडदे, छत्रपती कावळे, आत्माराम नागरगोजे, विठ्ठल मुंडे, केशव खडके, मोतीराम गडदे, अंकुश गडदे, मुरलीधर गडदे आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, जि. प. सदस्य प्रदीप मुंडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...