आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदीच्या कार्यक्रमानुसार गाळप:जय महेशचे 17 दिवसांत 1 लाख मे. टन गाळप‎

माजलगाव‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव‎ तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश साखर‎ कारखान्याच्या प्रत्यक्ष गाळपास (ता. १) नोव्हेंबर सुरूवात‎ झाली होती. सतरा दिवसाच्या गाळपास दिवसामध्ये एक‎ लाख दहा हजार मेेट्रीक टन उसाचे गाळप केल्याची माहिती कारखान्याचे व्यवस्थापक पारसनाथ जायसवाल यांनी दिली‎ आहे.‎ पवारवाडी येथील खाजगी तत्वावर असलेल्या जय महेश‎ साखर कारखान्याने उस गाळपाची क्षमता वाढविली असुन‎ या गाळप हंगामामध्ये उस गाळपाचे नियोजन करण्यात आले‎ आहे. त्यानुसार उस तोड यंत्रणेच्या माध्यमातुन उसतोडणीचे‎ ‎ काम सुरू आहे. यावर्षी झालेल्या‎ ‎ जोरदार पावसामुळे लागवड व‎ ‎ खोडवा उसाला सरासरी चाळीस ते‎ ‎ पन्नास टन प्रतिएकर पेक्षा अधिकचा‎ उतार शेतकऱ्यांना मिळत नाही.‎ ‎

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी‎ उसाच्या वजनामध्येही घट होत आहे.‎ जय महेश कारखान्याने प्रतिदिन उस‎ गाळप क्षमता आठ हजार पाचशे मेट्रीक टन केलेली असून हा‎ कारखाना प्रत्यक्ष आठ हजार दोनशे ते‎ ‎ आठ हजार तिनशे मेट्ीक टन प्रतिदिन‎ ‎ उसाचे गाळप करत आहे. १ नोव्हेंबर‎ पासुन या कारखान्याच्या गाळप हंगामास प्रत्यक्ष सुरूवात‎ झाली होती. (ता. १७ ) गुरूवार अखेर एक लाख दहा‎ हजार मेेट्रीक टन उसाचे गाळप केले असल्याची माहिती‎ कारखान्याचे व्यवस्थापक पारसनाथ जायसवाल यांनी दिली‎ आहे.‎ जय महेश कारखान्याने या हंगामामध्ये गाळप क्षमता‎ वाढविलेली आहे.

परिसरातील संपूर्ण उसाचे गाळप हा‎ कारखाना करणार असून उसतोड यंत्रणा मोठ्या प्रमाणावर‎ कार्यान्वीत केलेली आहे. शेतकऱ्यांनी उस गाळपाची घाई‎ करू नये. उस नोंदीच्या कार्यक्रमानुसार उस गाळपास‎ आणला जाईल, असे मुख्य शेतकी अधिकारी सुजय पवार‎ यांनी सांगितले. दरम्यान, तालुक्यासह परिसरात यंदाचे‎ उसाचे क्षेत्र वाढलेले आहे. त्यात कारखान्यांनी गाळप क्षमता‎ वाढवल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा निश्चितपणे‎ मिळणार आहे. गतवर्षी ऊस उत्पादन वाढलेले असल्याने‎ त्यात गाळप क्षमता पुरेशी नसल्याने तीनही कारखान्यांसमोर‎ आयत्या वेळी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु, यंदा‎ कारखान्यांना हंगामाचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ‎ उपलब्ध झाल्याने पळापळ करावी लागणार नाही.‎

बातम्या आणखी आहेत...