आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाची उदासीनता:मंजरथ ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन; रस्त्यासाठी उतरले गोदावरी नदीपात्रात

माजलगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंजरथ येथील गावकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी शुक्रवारी जलसमाधी आंदोलन केले. गोदावरी नदीतीरावर वसलेल्या मंजरथची लोकसंख्या ४ हजार आहे. ऐतिहासिक वास्तूंमुळे गावाला तीर्थक्षेत्र विकासाचा दर्जा आहे.गोदातीरावरील घाटासह लहान मोठी जवळपास ४० मंदिरे येथे आहेत. गोदावरी, सिंदफणा व गुप्त सरस्वती या नद्यांचा येथे संगम आहे. त्यामुळे दशक्रिया विधीसह इतर धार्मिक विधीसाठी राज्यभरातून रोज नागरिक येथे येतात. परंतु, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मंजरथ-माजलगाव रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारकांना व शालेय विद्यार्थ्यांना त्रास होतोय. हा रस्ता तातडीने करावा, यासाठी जलसमाधी आंदोलन केले. मंजरथ रस्त्यावरून गोविंदपूर, मनुरवाडी, देपेगाव, सांडस चिंचोली, आळशेवाडी येथील नागरिक ये जा करतात, असे मंजरथ येथील पुरोहित बाळू उपाध्ये, भीमराव कदम यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...