आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरळीतील कथित कोट्यवधींच्या जलयुक्त शिवार घोटाळ्यातील फरार कृषी पर्यवेक्षकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७ डिसेंबरला धारूरात अटक केली. त्यास परळी शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
बाळासाहेब गणपत केंद्रे (रा. घाटनांदूर, ता. अंबाजोगाई) असे त्या आरोपीचे नाव आहे. तो कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होता. २०१८मध्ये परळी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी परळी शहर ठाण्यात तीन गुन्हे नोंद झाले होते. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ४ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात २४ आरोपी निष्पन्न झाले होते.
त्यापैकी एक मयत असून, १८ जणांना अटक केली होती. पाचजण फरार आहेत. यापैकीच बाळासाहेब केंद्रे यास गुन्हे शाखेच्या पथकाने धारूरमध्ये अटक केली. त्यास पुढील तपासासाठी परळी शहर ठाण्याच्या स्वाधीन केले आहे. ८ रोजी त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पो.नि. हरिभाऊ खाडे यांनी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार राजू पठाण, विष्णू चव्हाण, एम.डी. कांबळे, बाळासाहेब जायभाये, अर्जुन यादव यांनी ही कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.