आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:लाच घेणाऱ्या उपनिरीक्षकासह जमादाराला केली अटक

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ३० हजारांची मागणी करत दहा हजार रुपये घेतल्यानंतर पुन्हा तडजोडीअंती १५ हजारांची लाच स्वीकारताना बीड शिवाजीनगर ठाण्यातील एका उपनिरीक्षकासह पोलीस अंमलदारास रंगेहाथ पकडण्यात आले. औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली. पोलिस उपनिरीक्षक राजू भानुदास गायकवाड व पोलिस अंमलदार विकास सर्जेराव यमगर अशी रंगेहाथ पकडलेल्या दोघांची नावे आहेत.ते दोेघे बीड येथील शिवाजीनगर ठाण्यात कार्यरत आहेत. एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात १७ ऑक्टोबर रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी उपनिरीक्षक गायकवाड व अंमलदार यमगर यांनी तक्रारदाराकडे ३० हजारांची मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...