आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:लाच स्विकारताना उपनिरीक्षकासह जमादार गजआड ; लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केली कारवाई

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ३० हजारांची मागणी करत दहा हजार रुपये घेतल्यानंतर पुन्हा तडजोडीअंती १५ हजारांची लाच स्विकारताना बीड शिवाजीनगर ठाण्यातील एका उपनिरीक्षकासह पोलीस अंमलदारास रंगेहाथ पकडण्यात आले. औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवाारी सायंकाळी ही कारवाई केली.

पोलिस उपनिरीक्षक राजू भानुदास गायकवाड व पोलीस अंमलदार विकास सर्जेराव यमगर अशी रंगेहाथ पकडलेल्या दोघांची नावे आहेत.ते दोेघे बीड येथील शिवाजीनगर ठाण्यात कार्यरत आहेत. एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुध्द बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १७ ऑक्टोबर रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी उपनिरीक्षक गायकवाड व अंमलदार यमगर यांनी तक्रारदाराकडे ३० हजारांची मागणी केली होती. तसेच त्यातील १० हजारांची रक्कम यापूर्वीच घेतल्यानंतर पुन्हा ५ डिसेंबर रोजी तडजोडी अंती पंचासमक्ष १५ हजारांची लाच घेताना दोघांनाही औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांंच्या पथकाने बीड येथे रंगेहात पकडले.बीड शहरातील बसस्थानकासमोरील गणेश उडपी हॉटेलनजिक ही कारवाई करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...