आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनता ठाकरेंसोबत:पक्षाला धोका देऊन आमदार गेले तरी जनता ठाकरेंसोबतच

बीड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेला धोका देऊन आमदार गेले असले तरी महाराष्ट्रातील अठरापगड जाती,धर्मातील सर्वसामान्य माणूस पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा असून ते आगामी निवडणुकीत सिद्ध होईल असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी येथील बैठकीत व्यक्त केले.

शनिवारी अंबाजोगाईत शिवसेनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर माजलगाव उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके, अंबाजोगाई शहर प्रमुख गजानन मुडेगावकर,माजी उपजिल्हाप्रमुख राजेभाऊ लोमटे,माजी तालुकाप्रमुख बाबासाहेब पांडे, तालुका समन्वयक बालासाहेब शेप,मदन परदेशी, माजलगावचे उपतालुकाप्रमुख अतुल उगले, दासु दाभाडे, नामदेव सोजे आदींची उपस्थिती होती . यावेळी बोलताना आप्पासाहेब जाधव म्हणाले, आगामीसर्व निवडणुकीत आपण सर्व ताकदीनिशी लढणार आहोत. पदाधिकारी पेक्षा लोकप्रतिनिधी कसे होता येईल याकडे शिवसैनिकांनी लक्ष दिले पाहिजे, आगामी काळात आपल्या पक्षाची सत्ता पुन्हा येणार असून सर्व गट तट सोडून पक्ष कसा मोठा करता येईल हे शिवसैनिकाच कर्तव्य आहे असे सांगितले.

या बैठकीला महिला आघाडीच्या जयश्रीताई पिंपरे,रेखा घोबाळे, अॅड.सुनीता जोशी, जयश्री मोरे, उपतालुकाप्रमुख वसंत माने, नागेश कुंभार, शहर समन्वयक अर्जुन जाधव, उपशहरप्रमुख शिवकांत कदम,शहर संघटक रत्नेश्वर वाघमारे, नागेश सावंत, युवासेनेचे अभिमन्यू वैष्णव, अॅड.विशाल घोबाळे,रमेश टेकाळे,बाळासाहेब वाघाळकर,अशोक हेडे,संतोष काळे, सुहास मोहिते, जालिंदर आपेट, सुधाकर काचरे,भागवत लाखे, गणेश मोरे, अनिरुद्ध पांचाळ, वैजनाथ सोनवणे,मोरेवाडी चे माजी सरपंच मारोती मोरे, धर्मराज मोरे,राम मगर, विष्णू धायगुडे, शिवनारायण गुजर, संभाजी शिंदे,निकम, विशाल कुलकर्णी,रवी मुंडे गावकर,हुसेन शेख,उत्तम कुंडगर,देवमाने यांच्या सह सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

सामान्य शिवसैनिकांची ताकद दाखवून देण्याची ही वेळ
यावेळी अप्पासाहेब जाधव यांच्यासह इतर शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनीही बैठकीत मनोगत व्यक्त केले. येत्या निवडणुकांमध्ये ताकदीने लढण्याचा निर्धार करण्यात आला. सामान्य शिवसैनिकांची ताकद दाखवून देण्याची वेळ आली असून नागरिकांमध्ये पोहचून शिवसैनिकांनी कामाला लागावे असेही जाधव यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...