आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जन्मभूमी नाथ्र्यात ग्रा.पं. साठी मुंडे बहीण-भाऊ एकत्र

परळी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एरवी राजकीय सख्य नसलेले धनंजय आणि पंकजा मुंडे हे बहीण- भाऊ एकत्रित यावेत अशी चर्चा मुंडे परिवारावर प्रेम करणाऱ्यांत सातत्याने होत असते. राजकीय मैदानात एकमेकांवर टीका करताना आक्रमक होणारे दोन्ही नेते त्यांचे मूळ गाव असलेल्या परळी तालुक्यातील नाथ्रा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मात्र एकत्रित आले आहेत. चुलत भाऊ अभय मुंडे यांच्या सरपंचपदासाठी दोघांनीही पाठिंबा दिला असल्याने एकाच बॅनरवर पंकजा, धनंजय यांचे फोटो दिसत आहेत. त्यामुळे, तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीत विरोधात लढणारे दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

परळीत ८० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. गावकारभाऱ्याच्या निवडीसाठी प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे. चार गावचे सरपंच बिनविरोध निघाले आहेत.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पातळीवरील नेते ताकद पणाला लावताना दिसत आहेत परंतु मुंडे घराण्यातील भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांचे गाव असलेल्या नाथरा गावात निवडणुक होत आहे.राज्य व राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणाऱ्या पंकजा व खा.डॉ.प्रितम मुंडे यांना आपल्या गावात स्वतंत्र पॅनल उभा करता आलेला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अभय मुंडे यांना पंकजा मुंडेंची साथ लाभत आहे.अभय मुंडे हे धनंजय मुंडे,अजय मुंडे यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सक्रिय असताना पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना साथ दिल्याच्या या भुमिकेची तालुक्यात चर्चा होत आहे.

सदस्य बिनविरोध सरपंचपदात अडकले
नाथरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यात समेट झाल्यानंतर एकत्रितपणे बिनविरोध काढण्याचे ठरल्यानंतर दोघांनीही समर्थक सदस्य देवुन ९ पैकी ८ सदस्य बिनविरोध काढले . परंतु गावकऱ्यांनी प्रभाग क्र.२ मध्ये सदस्यपदासाठी व सरपंच पदासाठी उमेदवार दिल्याने व सरपंचपद जनतेतुन निवडावयाचे असल्याने ८ सदस्य बिनविरोध निघाले आहेत परंतु सरपंच पदामुळे निवडणुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...