आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:जावयाने सासरवाडीत घेतला गळफास

बीड3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सासरवाडीच्या त्रासाला कंटाळून कृष्णा बालासाहेब शेळके (३०, रा. आचार्य टाकळी, ता. परळी) या जावयाने सासरवाडीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी परळी तालुक्यातील कौडगाव घोडा (ता. परळी) येथे उघडकीस आली.

कृष्णाचा विवाह कौडगाव घोडा येथील शीतलसोबत झालेला असून त्यांना तीन अपत्ये आहेत. कृष्णा आणि शीतलमध्ये नेहमी वाद होत असत. शीतलने याबाबत सांगितल्यानंतर तिचे वडील दिलीप दादाराव धुमाळ, आई सुनीता आणि भाऊ शिवाजी हे नेहमी कृष्णाला शिवीगाळ करून मारहाण करत आणि जिवे मारण्याची धमकी देत होते. सोमवारी (दि.२०) शीतल माहेरी असताना तिच्या मुलगा आजारी पडल्याने त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कृष्णा कौडगाव घोडा येथे मुक्कामी गेला तेथेच त्याने आत्महत्या केल्याची फिर्याद त्याची आई शोभाबाई बाळासाहेब शेळके यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...