आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणाची बाजी?:परळीच्या जवाहर एज्युकेशन सोसायटीसाठी मुंडे बहिण- भावांची प्रतीष्ठा पणाला, पुढील आदेशापर्यंत मतमोजणीला बंदी

परळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परळी वैजनाथ मधील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेची निवडणूक प्रकिया तब्बल १२ वर्षांनंतर पूर्ण झाली. शनिवारी झालेल्या मतदानानंतर 1221 पैकी 811 मतदारांनी हक्क बजावला तर आमदार धनंजय मुंडे यांनीही मतदान केले. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत मतमोजणी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मतदान केंद्रावर भेट देत आपल्या समर्थकांचा उत्साह वाढवला. शहरातील मोठ्या शैक्षणिक संस्थेवर कोणाचे वर्चस्व असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कोणाची होणार निवड?

या निवडणूकीतून ३१,आश्रयदाता सभासदांतून १, हितचिंतक १ व सहाय्यक सभासदातून १ असे ३४ संचालक निवडले जाणार होते. यामध्ये आश्रयदाता गटातून आमदार धनंजय मुंडे व हितचिंतक गटातून पंकजा मुंडे बिनविरोध निवडून आले आहेत. तर उर्वरित ३२ जागांसाठी शनिवारी मतदान झाले.

नक्की प्रकरण काय?

जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणूक बारा वर्षांपूर्वी झाली होती. प्रदीप खाडे यांचा अर्ज वैध ठरवून पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश देत निवडणूक अधिकारी म्हणून द. ल . सावंत यांची नियुक्ती केल्यानंतर सावंत यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.